या कोड्यामध्ये चौरसांचे एक ग्रीड असते. काही चौरसांमध्ये अंक असतात तर काही चौरस रिकामे असतात. हे अंक 0 ते 3 या श्रेणीत असतात, आणि त्यानुसार त्या चौरसाच्या भोवती किती रेषा असाव्यात हे ठरते. उदा. २ हा अंक असलेल्या चौरसाच्या भोवती दोनच रेषा असतील, तर शून्य हा अंक असलेल्या चौरसाच्या भोवती एकही रेषा असणार नाही. ज्या चौरसामध्ये कोणताही अंक नाही त्या चौरसाभोवती कितीही रेषा असू शकतात.
तर, या अंकांची मदत घेऊन चौरसांभोवती रेषा अश्या प्रकारे काढायच्या आहेत कि जेणेकरून त्या रेषांची एक बंद परिक्रमा (closed loop) तयार होईल.
चौरसाभोवती रेषा काढण्यासाठी हव्या त्या पिवळ्या रेषेवर टिचकी मारा. काढलेली रेषा पुसण्यासाठी त्याच रेषेवर पुन्हा एकदा टिचकी मारा.
या सूचना लपविण्यासाठी वरच्या चिन्हावर टिचकी मारा.