×
शब्दशोध - कसे खेळावे?
शब्दशोध खेळ शब्द शोधण्याचा आहे. या खेळामध्ये विविध सात शब्दांची यादी दिली जाते आणि खेळाडूंना त्या शब्दांची अक्षरे ग्रीडमध्ये शोधून काढावी लागतात. ग्रीडमध्ये शब्द आडवे, उभे, तिरपे किंवा उलट दिशेने असू शकतात.
एकदा तुम्हाला शब्द सापडला की,त्याच्या अक्षरांवरुन माउस किंवा बोट फिरून त्यांची निवड करा. जर तो शब्द बरोबर असेल तर ठळक हिरव्या रंगात दिसू लागेल. कमीत कमी वेळात सर्व शब्द शोधून काढणे हे या खेळाचे उद्दिष्ट आहे.
सर्व शब्द शोधल्यावर खेळ पूर्ण होतो. खेळ पूर्ण झाल्यावर तुम्ही दवंडी पिटवू शकता. त्यासाठी लाऊडस्पिकर च्या बटनावर टिचकी मारा. मग तुमच्या खेळाची दवंडी क्लीपबोर्ड ला कॉपी होईल. मग आपण ती कोठेही पेस्ट करू शकता.
हा खेळ तुमच्या शब्दज्ञानाची आणि तर्कशक्तीची परीक्षा पाहतो. भाषेची शब्दसंपत्ती वाढवण्यासाठी आणि मनोरंजनासाठी हा उत्तम मार्ग आहे. हा खेळ कसा वाटला हे आम्हाला इमेल करून जरूर कळवा. (vegapoint@gmail.com)