कसे खेळावे?
या खेळात एका चित्राचे तुकडे करून ते विस्कळीत करून सादर केले जातात. खेळ खेळणाऱ्याला ते तुकडे योग्य ठिकाणी आणून मूळ चित्र तयार करायचे आहेत. तुकड्यांची जागा बदलण्यासाठी कोणतेही दोन चौकोन निवडून त्यांची अदलाबदली करता येते. तुकडा निवडण्यासाठी त्याच्यावर टिचकी मारा. पहिला तुकडा निवडल्यानंतर त्याच्याभोवती काळी सीमा दिसते. दुसरा तुकडा निवडल्यावर त्यांची अदलाबदल होते. सर्व तुकडे योग्य जागी बसले कि खेळ समाप्त होतो.
कमीत कमी वेळेत व कमीत कमी प्रयत्नांत चित्र तयार करणे हे या खेळाचे उद्दिष्ट आहे. संपूर्ण खेळ खेळून झाल्यावर दवंडी पिटविता येईल. त्यासाठी लाऊडस्पीकर च्या बटनावर टिचकी मारा. दवंडी क्लिपबोर्ड ला कॉपी केली जाईल.
दैनिक खेळामध्ये दररोज एक चित्र असेल व ते सर्वांना समान असेल.